Ad will apear here
Next
‘दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे मार्गदर्शन शिबिर
पुणे : ‘आर्किटेक्ट पात्रता परीक्षेत झालेले बदल, आर्किटेक्ट क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे ‘नाटा’ (एनएटीए) परीक्षांची तयारी करावी आदी गोष्टींची माहिती देण्यासाठी ‘दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे एकदिवसीय मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी दिली.

हे शिबिर ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत कर्वेनगर येथील मजेंटा लॉन्स (राजाराम पुलाजवळ) येथे होणार आहे. या विषयी अधिक माहिती देताना शिबिराच्या संयोजिका रश्मी कुलकर्णी म्हणाल्या, ‘शासनातर्फे नुकतेच पात्रता परीक्षेसाठीच्या नियमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. हे बदल नक्की काय आहेत हे विद्यार्थ्यांना पोचविणे आवश्यक आहे. पूर्वी ‘नाटा’ परीक्षेसाठी बारावीतील कोणत्याही शाखेचा विद्यार्थी गणित विषय घेतल्यास या परीक्षेसाठी पात्र ठरत असे; मात्र आता केवळ विज्ञान शाखांचे विद्यार्थ्यीच या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.’

‘बदलेल्या नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे. यासाठी आर्किटेक्टच्या परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर सध्या कार्यरत असणारे प्रा. रणजीत घोगले, प्रकाश देशमुख, मृणालिनी साने व राधिका वैद्य हे या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे,’ असे आवाहन रश्मी कुलकर्णी व जयश्री देशपांडे यांनी केले आहे.

शिबिराविषयी :
दिवस :
रविवार, ३१ मार्च २०१९ रोजी
वेळ : सकाळी १० ते रात्री आठ
स्थळ : मजेंटा लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZLFBY
Similar Posts
‘पुणे आर्किटेक्चरल कन्सल्टंट्स असोसिएशन’च्या अध्यक्षपदी सत्यजित शेळके पुणे : नुकत्याच झालेल्या पुणे आर्किटेक्चरल कन्सल्टंट्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. २०१९ ते २०२१ अशा दोन वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. विद्यमान अध्यक्ष आर्किटेक्ट हृषीकेश भुतकर यांच्याकडून आर्किटेक्ट सत्यजित शेळके यांनी कार्यभार स्वीकारला.
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language